गावाविषयी माहिती
सापरोंडे ग्रामपंचायत हि महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये सापरोंडे , मांगाठणे ,वर्धा अशी महसूल गावे आहेत. ग्रामपंचायत ची लोकसंख्या . सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २०८९ आहे ...ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ४, अंगणवाडी केंद्रे ५ व व्यायामशाळा १,समाजगृह -२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे मांगाठाणे गावात साईबाबा मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे.सापरोंडे ग्रा.पं.हद्दीमध्ये औदौगिक कारखाने असून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून झेंडू,मोगरा,भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात.
सापरोंडे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, ०९ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
सापरोंडे गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.